नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी भारत बायोटेकच्या कंपनीने पुणे येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा.लि. बायोवेट कंपनीची जागा मिळावी व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वॅक्सीन बनविण्याची कंपनी येत असल्याचा खुलासा केला आहे.
दिपक कपूर (एम.डी. मिहान) :-
मिहानच्या प्रमुखांनी वन टू वन दि.17/02/2021 रोजी नागपूरमध्ये प्रेस सोबत बोलताना मिहानमध्ये विकासांना गती आणण्याकरिता या काळात कोरोना वॅक्सीनची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी बायो-टेक कंपनीला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता व दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी बायोटेकला पत्र न पाठवता बायोकॉन या कंपनीला पत्र पाठविले, परंतु पत्रात बायोटेक कंपनीचाच उल्लेख केला आहे.
अजितदादांचे स्वागत :-
नागपूर मिहान मध्ये एम.डी.दिपक कपूर यांनी वॅक्सीन कंपनी संदर्भात प्रक्रिया सुरु करीत असताना अजितदादांनी राज्याचे दमदार मंत्री म्हणून व पुण्याचे पालकमंत्री म्हणून इंटरवेट इंडिया प्रा.लि.कंपनी यांची जागा भारत बायोटेकला मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून परवानगी मिळवून दिली व त्यावर मा.उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या प्रक्रियेत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून व पुण्याचे पालकमंत्री म्हणून प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली व वॅक्सीन निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक पुणे येथे स्थापित झाली. याबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत
नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी :
राज्याची उपराजधानी वर अन्याय होऊ नये, ही भूमिका राज्य शासनाचे उपमुख्यमंत्री म्हणून आपली होती. परंतु नागपूर जिल्ह्याचे मंत्री हे निष्क्रिय व अपयशी असल्यामुळे आपली जबाबदारी पार पाडू शकले नाही. आपण स्वत: आपल्या पदाचा उपयोग करून पुण्यासारखेच नागपुरात वॅक्सीनची कंपनी नागपुरात सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास कंपनी नागपुरात येऊ शकते. नागपूरातील मिहान येथे मुबलक प्रमाणात जागा देखील उपलब्ध आहे.
तरी उपराजधानी सोबत अन्याय होणार नाही, याची काळजी आपण घ्यावी, अशी विनंती.