Published On : Mon, May 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मृत्यूच्या दाढेत गेलेल्या पवनसाठी ऑरेंज सिटी हॉस्पीटलचे डॉक्टर ठरले देवदूत…

Advertisement

नागपूर येथील पवन दुचाकीने जात असताना एका वेगवान कारने त्याला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, तो दुचाकीसह काही फुट अंतरावर फरफटत गेला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. डोक्याचा मार इतका जबरदस्त होता की पवन बेशुद्ध अवस्थेत निपचित पडला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन इसमाने त्याला ३ हॉस्पीटलमध्ये भरती केले. त्या तिन्ही हॉस्पीटलने त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. त्याचा अपघातानंतर एक तासानंतर त्याला ऑरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले. पवनवर उपचार करणे ही मोठी जोखीम होती.

सर्व प्राथमिक तपासण्या केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पवनला मेंदूमध्ये जबरदस्त मार लागल्यामुळे ठिकठिकाणी सूज आणि रक्तस्त्राव आल्याचे सिटी स्कॅनमध्ये दिसून येत होते. त्याच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने एकाबाजूचा मेंदू दुसऱ्याबाजूस सरकला होता. उजव्या कानाच्या बाजूसही बरीच दुखापत झाली होती. त्याला श्वास घेतांना त्रास होत होता. तो बेशुद्धअवस्थेतच होता.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान पवनच्या कुटूंबाला ही वार्ता कळविण्यात आली. त्यांनी लगेच हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. त्यांची समंती घेऊन न्यूरोसर्जन डॉ.विशाल तराळे यांच्या नेतृत्वात ऑरेंज सिटी हॉस्पीटलच्या टीमने पवनच्या मेंदूची शस्त्रक्रिया केली. रक्तस्त्राव भरपूर झाल्याने रक्ताची नितांत गरज होती. रक्ताची व्यवस्था करण्यात आली. (लेफ्ट फ्रंटल-पॅरिएटल-टेम्पोरल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी) ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवनला काही दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. संपूर्ण उपचारादरम्यान त्याला आधार देण्यात आला.

पवन जवळपास ४६ दिवस आयसीयूमध्ये भरती होता. शस्त्रक्रियेनंतरही त्याला १५ ते १७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. इतके दिवस आयसीयूमध्ये उपचार करताना रूग्णाचे मनोधर्य कायम ठेवणे ही सर्वांसाठी कसोटी होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने ईएनटी सर्जन डॉ.रचना गंगवानी यांनी पवनची ट्रेचेस्टॉमी केली. त्याला नळीद्वारे आहार देण्यात आला. त्याला सुधारण्यासाठी बराच अवधी लागला. छातीरोग तज्ज्ञ डॉ.सुशांत मुळे यांच्या मार्गदर्शनात त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. पवनची मेंदूची जखम व सूज सुधारली आणि शेवटी त्याची क्रेनियोप्लास्टी करण्यात आली.

हळूहळू त्यबेत सुधारल्यानंतर त्याच्या सर्व अववयांची फिजियोथेरेपी करण्यात आली, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. मोहित घारपूरे आणि डॉ.अक्षय बुर्लावार यांची चमू सतत रूग्णावर देखरेख ठेवत होती. ऐनिस्थेशियाची टीम डॉ.स्मीता हरकरे, डॉ.अनिता पांडे, डॉ. स्मीता देशपांडे यांच्यासह सर्व ऑपरेशन थेएटरमधील सर्व स्टाफ यांनी रूग्णाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रेडिओलॉजीस्ट डॉ.अमोल गव्हाले, डॉ. मयूर महादूले तसेत फिजिओथेरेअपिस्ट डॉ.अतुल डेकाटे, आहारतज्ज्ञ दिप्ती हटवार यांचेही सहकार्य मोलाचे होते.

पवन शर्मा डिस्टार्चच्यावेळी अतिशय आनंदित होता. त्याच्या सर्वक्रिया व्यवस्थित सुरू होत्या. वार्डमध्ये १० दिवस राहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला होता. परिवारातील सदस्यांना आनंदाश्रू येत होते. त्याच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा पुनर्जन्मच होता.

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अतिशय गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीसाठी एकतास हा अतिशय महत्त्वाचा असतो. एक तास म्हणजे गोल्डन अवर् या तासाभरात त्याला उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. क्रिटिकल केसेसमध्ये त्या व्यक्तिला चांगल्या सुविधायुक्त हॉस्पीटलमध्ये उपचार मिळणे आवश्यक असल्याचा सल्ला चेअरपर्सन डॉ.विद्या नायर यांनी दिला.

Advertisement