कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील वराडा बंद टोल महामार्ग पोलीस चौकी सामोर नागपुर कडुन जबलपुर कडे जाण्या-या बाहेर लाईन च्या दोन बारा चाकी ट्रकचा अपघातात ट्रक मध्ये चालक फसुन गंभीर जख्मी झाल्याने मेडीकल नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मंगळवार (दि.१४) ला सकाळी ९ वा. दरम्यान नागपुर जबलपुर चारपदरी महा मार्गावरील वराडा बंद टोल जवळील महामार्ग पोलीस चौकी सामोर नागपुर कडुन जबलपुर कडे तुर भरून जाण्या-या १२ चाकी ट्रक क्र ए पी ०२ टी एच २४५९ एकाएक थाबंल्याने नागपुर कडु नच म्हणजे मागुन भर वेगाने येणा-या मँगो जुस भरलेला १२ चाकी ट्रक क्र एच आर ५६ बी ७८३४ च्या चालकाचे नियंत्र ण सुटुन सामोरील ट्रकच्या मागे जोरदार धडक होऊन चालक ट्रक मध्ये फसुन गंभीर जख्मी झाला.
ट्रकचे सुध्दा भयंक र नुकसान झाले आहे. महामार्ग पोलीस व कन्हान पोलीसानी त्यास बाहेर काढुन उपचारार्थ नागपुर ला पाठविले. ट्रक चालकांच्या दोन्ही पायाला गंभीर ज़ख्म असल्याने मेडीकल नागपुर येथे उपचार सुरू आहे. ट्रक चालक गंभीर जख्मी असल्याने त्याचे नाव माहीत होऊ शकले नाही. कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.