स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महापौर स्वररत्न गायन स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवार, ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते होईल. यावेळी त्यांच्या हस्ते श्री.प्रभाकर धाकडे गुरुजी, श्री. भोलाघोष, श्री.पदमाकर तंत्रपाळे यांना नागपूर रत्न देऊन यांचा गौरव केला जाईल. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., बसपाचे पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे गटनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, प्रभाग क्र. ३१ च्या नगरसेविका उषा पॅलट, शीतल कामडे, नगरसेवक सतीश होले, रवींद्र भोयर उपस्थित राहतील.
कोरोना नियमांचे पालन करीत उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केले आहे.