नागपूर : प्रयागराजमधील पवित्र संगम येथे महाकुंभ 2025 चा पवित्र सोहळा सुरू झाला आहे. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभाचे पहिले अमृत स्नान (शाही स्नान) साजरे केले जात आहे. मकर संक्रांतीनिमित्त मंगळवारी पहाटे 5:30 वाजता स्नानाला सुरुवात झाली.
संगमात सुमारे 3 कोटी भाविकांनी स्नान केले. धार्मिक दृष्टिकोनातून हे स्नान खूप महत्त्वाचे आहे. संगम येथे लाखो भक्त, संत आणि नागा बाबा जमले आहेत. विदेशी नागरिकांचा लक्षणीय सहभाग, हे या पर्व स्नानाचे वैशिष्ट्य ठरले.आजच्या स्नानासाठी जलसंधारण विभागाने गंगा नदीत अतिरिक्त पाणी सोडले होते.
त्यामुळे गंगा नदीच्या प्रवाहाचा वेग नेहमीपेक्षा अधिक होता. मुख्य म्हणजे गंगा नदीतील पाणी अत्यंत स्वच्छ असल्याने भाविकांना स्नानाचा आनंद अनुभवता आला. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा महाकुंभमेळ्याचा कालावधी आहे.