नागपूर: स्थानिक खेळाडूंचा मैदान बचावासाठी दिवसे-दिवस खेळाडू मध्ये व सामान्य जनतेमध्ये रोष वाढतच आहे. आज नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात खेळाडू मंगेश खुरसडे व तेजस पाटील यांच्या नेतृत्वात खेळाडूंनी संघाच्या केशवदार येथे खेळाडूंनी मुंडन करुन नागपूर सुधार प्रन्यासची केशवद्वार येथून रेशिमबाग चौकापर्यंत प्रेतयात्रा काढली. संघाच्या केशवद्वार खाली आंदोलनात सुरुवात झाली. “रेशिमबाग मैदान के सन्मान मे आम नागरिक मैदान में” “छोडो छोड़ो मैदान छोड़ो,रेशिमबाग मैदान हमारा है” असे घोष वाक्य देऊन धरना, प्रदर्शन करण्यात आले.
नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की नागपूर सुधार प्रन्यास च्या अधिक्षक अभियंता यांनी आश्वासन दिले होते की डॉक्टर असोसिएसनचा कार्यक्रम जो पर्यंत आहे. तो पर्यंत खेळाडूंना ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करुन देऊ पण ईश्वर देशमुख मैदानावर खासदार महोत्सव सुरु आहे. आठवडा भर चालणाऱ्या कार्यक्रमाची त्यांना कल्पना नव्हती का? म्हणून पुन्हा आज खेळाडू व पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आठवडाभर मनोरंजनाच्या महोत्सव “खास”दार पण नागपूरकर युवक नौकरीच्या चितेंने होतोय, रोज”गार”! विकासाबाबत विचारु नका रोज-रोज मनोरंजन सत्ताधार्यांकडून तुम्हाला रोजगार हवा की निव्वळ मनोरंजन ? तुम्हीच ठरवा ! असा सवाल बंटी शेळके यांनी उपस्तिथ केला.
पुढील महिन्यात होणाऱ्या पोलीस भर्ती साठी खेळाडूंना कुठलेच मैदान उपलब्ध नाही.खेळाडूंनी पहिलेच जाहिर केले आहे की निवड झाली नाहीतर सुधार प्रन्यास च्या कार्यालया समोर आत्मदहन करू.
डॉक्टर असोसिएशन चा कार्यक्रम संपल्यावर मैदान सुस्थितीत करण्याची जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी करावी पण डॉक्टरांनी जी अनामत रक्कम सुधार प्रन्यास कडे जमा केली आहे. त्या रक्कमेतुन रेशिमबाग मैदान सुधारण्यात यावे.खेळाडूंनी सतत केलेल्या आंदोलनात मागणी केली होती की सुधार प्रन्यास चा भ्रष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या संगतमताने केलेल्या भ्रस्टाचाराची चौकशी करुन कारवाई करावी व कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द करावा पण यातील काहीच झाले नाही.याचा अर्थ वरिष्ठ अधिकारी पण या भ्रष्टचाराला खतपाणी घालत आहे.
लोकशाही व अहिंसक मार्गाने चालणारे खेळाडूंचे आंदोलन पोलीस प्रशासन दडपणाऱ्या प्रयत्न करित आहे. रितसर परवानगी असल्यावरही वरच्या दबावमुळे पोलीस प्रशासन कुठल्या ना कुठल्या कारणाने लुडबुड करीत असता नगरसेवक बंटी शेळके यांची पोलिसांशी वादावादी झाली. बंटी शेळके व खेळाडू पोलिसांना न जुमानता आपले आंदोलन सुरुच ठेवले व रस्ता रोको करण्यात आला. लोकांचे मिळणारे समर्थन बघता पोलीस प्रशासन नमले. या पुढे रेशिमबाग मैदानावर खेळा शिवाय कुठलाही कार्यक्रम झाला तर सुधार प्रन्यास अधिकांऱ्याची गाढवावरुन ढिंड काढू असा ईशारा देण्यात आला आजच्या या आंदोलनात राजेंद्र बांते, अंदाज वाघमारे,चक्रधर भोयर, निखिल वानखेड़े, हिमांशु बिंदा शुक्ला, सुमीत पाठक, स्नेहलता शुक्लावर, गुड्डू शेख, अक्षय हेटे,सुनील तालेवार, राजेंद्र ठाकरे, स्वप्निल बावनकर, निखिल मेश्राम, आयुष हिरणवार, राहुल धोपटे,धर्मेश भरडभूंजे, निखिल वांढरे, नीरज शाहू, निखिल लोणारे, पवन ढोने, योगेश भेंडे, एडविन अंथोनी, नितिन धांदे,प्रज्वल शनिवारे, प्रफुल इंजनकर,धीरज अंघिनवार,सागर चव्हाण, अक्षय घाटोळे, अतुल खानकुरे, गोलू ठोसर, नीलेश तलवारे, आशीष लोनारकर, सुनील ठाकुर, पूजक मदने, धीरज पांडे, पीयूष जैस्वाल,अभिजीत पांडे, मोंटू खोब्रागडे, सौरभ शेळके, हेमंत कातुरे, क्रुणाल जोध, अनिकेत संमुद्रे, आसिफ शेख, पलाश जगताप,माधव जुगेल,नितिन गुरव, निखिल बालकोटे, आसिफ अंसारी, शेख अजहर,आलोक कोंडापुरवार, अंकुश शेळके, प्रतीक शेळके,अक्षय ठाकरे, आकाश ठाकरे इत्यादि खेळाडू व कार्यकर्ते उपस्तिथ होते.