Published On : Mon, May 3rd, 2021

विधि संघर्ष ग्रस्त बालकाने मुलीचा केला बलात्कार

– फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करून तपास सुरू केला

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू दवाखाना गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणार्या रस्त्याचा बाजुला एक मुलगी बकर्या चारत असतांना विधि संघर्ष ग्रस्त बालकाने मुलीचा बलात्कार केले असता कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार टाकले असता कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान पोलीसांन कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ३० एप्रिल ला दुपारी २:३० ते ५:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी पिडिता ही आपल्या भावा सोबत नेहरु दवाखाना गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणार्या रस्त्याचा बाजु ने बकर्या चारत असतांना आरोपी विधि संघर्ष ग्रस्त बालकाने आल्पवयीन पिडिता हीची आंगात घातलेले कपडे काढुन तिचा अंगावर लेटुन तिचा बलात्कार केला व ती ओरडु नये म्हणुन तिचे तोंड दाबले .

असे फिर्यादी यांचा दाखल तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून भादवी कलम ३७६ AB सह लैंगिक अपराधा पासुन बालकाचे सरक्षण अधिनियम कायदा २०१२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा मार्गदर्शनात महिला सहायक पुलिस निरिक्षक (ए पी आई) नंदा पाटील मैंड्म पुढील तपास करीत आहे .

Advertisement