कर्जत : राज्यात शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. या महायुती सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली. अजित पवार यांनी आपल्या समर्थकांना घेऊन सरकारसोबत हातमिळवणी केली.
यावर अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी मोठा खुलासा केला आहे.
२०१७ साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आले. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झाले नाही. नाहीतर २०१७ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले असते, असे तटकरे म्हणाले.
२०१७ साली मला आणि अजित पवारांना सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. परंतु, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. सात-आठ महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा, खाती, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदेही ठरली होती. पण, काही कारणास्तव तसे झाले नाही, असे तटकरे म्हणाले. ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या विचारांनी आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे, असेही ते म्हणाले.