Published On : Sat, Dec 2nd, 2023

लोकसभेला राज्यातून ४५ जागा जिंकून द्यायचा महायुती सरकारचा मानस; एकनाथ शिंदेंचे नागपुरात विधान

Advertisement

नागपूर : एकनाथ शिंदे हे नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. परंतू त्यांना नागपूरला येण्यास खूप उशीर झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवारांनी आपण आपल्या खासदारांच्या चार जागा लढविणारच परंतू उद्धव ठाकरेंकडील खासदारांच्या जागाही लढवू शकतो, असे वक्तव्य केल्याने महायुतीत पुन्हा एकदा जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

Advertisement

यावर एकनाथ शिंदे यांनी नागपुरात सावध प्रतिक्रिया दिली आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही महायुतीचे तिन्ही घटक पक्ष म्हणून लढविणार आहोत. लोकसभेला राज्यातून ४५ जागा जिंकून द्यायच्या आहेत. एकत्र लढविणार असल्याने अजित पवारांनी तसे वक्तव्य केले आहे, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले आहे.