नागपूर:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित सत्ता संपादन रॅलीचे बुटी बोरी येथे विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून त्या संदर्भात आज दि ८ सप्टें ला नागपूर येथील संविधान चौकातून आदरनिय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून सत्ता संपादन महारॅली ची सुरुवात केली असून ही रॅली नागपूर वरून बुटीबोरी मार्गे वर्धा येथे प्रस्थान करीत असताना बुटी बोरी येथे वंचित बहुजन आघाडी,भारिप बहुजन महासंघ,भीम पँथर,पुरोगामी विचार मंच,व सर्व आंबेडकरी संघटना चे सर्व पदाधिकाऱ्यांनी या सत्ता संपादन रॅलीचे भव्य स्वागत केले.या सत्ता संपादन रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अण्णाराव पाटील हे होते.तर स्वागत करतांना भीम पँथर चे नागपूर जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे,देवनाथ हिरेखन, मंगेश चंदनखेडे,मिलिंद खडतकर,पत्रकार चंदू बोरकर,देव बागडे,राजू म्हैसकर,राहुल म्हैसकर,धम्मदीप वालदे,अनिल बहादूरे चेतन उरकुडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते