मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे वास्तव्य असलेल्या इमारतीचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रुपांतर. बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची इंदू मिलच्या जागेवर उभारणी जोरात. जपानमधील कोयासन विद्यापीठात डॉ. आंबेडकरांचा पुतळा. चैत्यभूमी व दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थस्थळ व पर्यटनस्थळाचा दर्जा. बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित 50 स्थळांचा गतिमान विकास सुरू. डॉ. आंबेडकरांच्या समग्र साहित्याचे पुनर्प्रकाशन.
अनुसूचित जातीमधील विद्यार्थी-महिलांसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेशासाठी विशेष सवलती. दहावी-बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी जिल्हास्तरावर वर्षाला 48 हजार, शहरी भागात 60 हजार अनुदान.
मोफत निवासी प्रशिक्षण
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षांसाठी औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे मोफत निवासी प्रशिक्षण. या परीक्षेच्या पुढील टप्प्यात देशातील नामांकित प्रशिक्षण केंद्रातही दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश. 2016 मध्ये 14 विद्यार्थी अंतिम परीक्षा, तर 2017 मध्ये 55 विद्यार्थी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण. बार्टीकडून गेल्या 3 वर्षांत 18 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण. त्यापैकी 11 हजार विद्यार्थ्यांना रोजगार.
फेलोशिप आणि वसतिगृहे
एमफील, पीएचडी सारख्या उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप योजना. ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअरसह शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा आता 8 लाख. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे वसतीगृहे.
जात प्रमाणपत्राची पडताळणी
आता सर्व जिल्ह्यांत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरू. (पूर्वी केवळ 15). रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी वडील, चुलते किंवा वडिलांकडील नातेवाईकाचे प्रमाणपत्र हाच आता मुख्य पुरावा. जात प्रमाणपत्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीस आता जात पडताळणीसाठी अर्ज करता येणार.
उद्योजक घडविण्यासाठी
उद्योग क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक प्रोत्साहन योजनेतून विशेष सवलती. विद्यमान योजनांच्या लाभासह आणखी सुविधा-सवलती मिळणार. एमआयडीसीकडील २० टक्के प्लॉट अनुसूचित जातीमधील उद्योजकांसाठी ३० टक्के सवलतीच्या दराने राखीव. अन्य भागातील भूखंड २० टक्के सवलतीत मिळणार. ग्रामीण व निमशहरी क्षेत्रामध्ये उद्योग उभारल्यास १५ ते ३० टक्के भाग भांडवल अनुदान.
समूह औद्योगिक विकास गट योजनेतील पायाभूत सुविधांसाठी १०० टक्के अर्थसहाय्य. विविध प्रकारच्या लघु उद्योगांनी ठराविक दराने वीज वापर शुल्काचा भरणा केल्यास त्यांना पाच वर्षासाठी विद्युत शुल्क अनुदान. प्रकल्पासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. नाविन्यपूर्ण उद्योगास अतिरिक्त १० टक्के प्रोत्साहन.
वंचितांच्या वस्ती-घरांसाठी
अनुसूचित जातीमधील सर्व बेघरांना 2019 पर्यंत हक्काची घरे. प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजनांतून मिळणार चांगली घरे. अनुसूचित जाती-नवबौद्धांच्या 125 वस्तींचा संपूर्ण विकास करणार. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या प्रलंबित कामांचा समावेश. अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्ती-गावांच्या रखडलेल्या विकासास गती मिळणार. तांडा वस्ती सुधार योजनेसह यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील सुधारणांमुळे जास्तीचा लाभ.
सामाजिक न्यायासाठी
ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना. अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणाली. ओळख निश्चितीसाठी छायाचित्र बारकोडची सुविधा. दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय. बागायती जमीन खरेदीसाठी आठ लाख आणि कोरडवाहू जमिनीसाठी पाच लाख रुपये देण्यात येणार. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना. चिरागनगर (घाटकोपर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक उभारणार. लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी (पुणे) येथील स्मारकाची कार्यवाही प्रगतीपथावर. राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय.