वर्धा: राज्याचे उर्जा, नविन व नविनीकरणीय *उर्जा मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे* यांनी आज दुपारी 12 वाजता शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळयास हार अर्पण करुन व त्यांचा आर्शिवाद घेऊन वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री पदाच्या कामाकाजाला सुरवात केली.
याप्रसंगी नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शिवाजी पुतळयाच्या सुशोभिरणाचे भूमीपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदिपसिह ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता(क्र.2) श्री. मंत्री, नगर परिषदेचे सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तत्पुवी नगर परिषदेच्या वतीने श्री. बावनकुळे यांचे मोठया जल्लोशात फाटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले.