Published On : Mon, May 10th, 2021

पालकमंत्री यांनी केली केंद्रीय नियंत्रण कक्षाची पाहणी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासन द्वारे संयुक्त रूपाने संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण सोमवारी (१० मे ) रोजी पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले. त्यांच्या सोबतआमदार श्री दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी पक्ष नेता श्री तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक श्री प्रफुल गुडधे, मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी , व जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासना तर्फे सेन्ट्रल कंट्रोल रुम मनपाच्या छत्रपति शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळयावर सुरु करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये रेमडीसिवीर, ऑक्सीजन पुरवठयाकरीता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालक मंत्री यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचा-यांशी चर्चा केली तसेच त्यांना रिअल टाइम माहिती रुग्णांचा नातेवाईकांना देण्याबद्दल सूचना केली. मनपा आयुक्तांनी त्यांना नियंत्रण कक्षाचे कामाबद्दल माहिती दिली.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त सर्वश्री. जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त श्री महेश धामेचा, श्री. महेश मोरोणे व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

मनपा मुख्यालयात सुरु करण्यात आलेली ही कंट्रोल रुम २४ तास सुरु आहे. येथे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (80% क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रुममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल. शिवाय कंट्रोल रुममधून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णांना दाखल करण्यास हॉस्पीटलला नकार देता येणार नाही. कंट्रोल रुममधून बेडच्या उपलब्धेसंदर्भात सातत्याने माहिती घेतली जाते. फोन च्या माध्यमातून कंट्रोल रुमशी संपर्क करत आहेत. टेलिफोन क्रमांक ०७१२ – २५६७०२१ (१० लाईन उपलब्ध करण्यात आले आहे.) तसेच व्हॉटसॲपचे माध्यमातून रुग्णांची विविध माहिती ७७७००११५३७, ७७७००११४७२ या नंबरवर पाठवता येईल. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाचा SPO2 लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकावर व्हॉटसॲपवर पाठविता येईल. यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने लवकरात-लवकर रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. संबंधीत हॉस्पीटलला देखील याची पूर्वसूचना दिली जात आहे.

अतिगंभीर स्वरुपातील कोव्हिड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत कंट्रोल रुमला याबाबत माहिती देणे संबंधीत रुग्णालयास बंधनकारक आहे. तथापी या सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधीत हॉस्पीटल कारवाईस पात्र राहील, असाही इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या केन्द्राच्या संचालनमध्ये श्रीमती निवेदीता सिंग, श्रीमती निरजा पठानिया यांची स्वंयसेवी संस्था वुई ७ केयर फाऊंडेशन चे सहकार्य मिळत आहे.

Advertisement