मुंबई: जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त उद्या मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात हॉटेलसाठी हायजिन रेटिंग आणि फूड फोर्टिफिकेशनची सुरूवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वच्छता राखणाऱ्या तीस हॉटेल्सना हायजिन रेटिंगचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यात मुंबईतील १५, पुणे येथील १० आणि नागपूर येथील ५ हॉटेल्सचा समावेश आहे.
याच बरोबर रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनी स्वच्छता पाळावी यासाठीही विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात मुंबई येथील जूहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, पुण्यातील सारसबाग आणि नागपूर येथील फुटाळा तलाव यांना क्लीन स्ट्रीट फूड हब बनविणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि एफ एस एस आय चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आणि असोशिएशन ऑफ फूड सायंटिस्ट ॲण्ड टेक्नोलॉजिस्ट, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न सुरक्षा दिन’ विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खालील कार्यक्रमांचा समावेश आहे.
1) फूड फोर्टिफिकेशन (Fortification of foods)
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणामार्फत प्रसिद्ध केलेल्या फोर्टिफाइड अन्न पदार्थाच्या Food safety and Standards (Fortification of foods ) Regulation, 2018 या नियमनात नमूद दूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यतेल, इ.मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, लोह, झिंक इ.चे फोर्टिफिकेशन करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे.
2) हायजिन रेटिंग ऑफ रेस्टॉरन्ट-स्कोअर ऑन डोअर्स
या योजनेअंतर्गत अन्न व्यावसायिकाकडून अन्न पदार्थाची सुरक्षिततेच्या (hygiene Rating) कोणते निकष अवलंबिले आहे याबाबतची माहिती ग्राहकास मिळण्यास मदत होते. ग्राहाकांना अन्न पदार्थ खरेदी किंवा खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय निवडणे तसेच व्यावसायिकांनी त्याचा वापर hygiene Standard वाढविण्यास उद्युक्त करणे हेच सदर योजनेचे उद्दिष्ट आहे.
3)अन्न व औषध प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ (वेबसाईट) व अन्न विभागाचे ऑनलाईन प्रणाली (FDA-MAH-FOSNET)
अन्न व औषध प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ (वेबसाईट) व अन्न विभागाच्या दैनंदिन कामकाजाकरिता ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अन्न् व औषध प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ गतिशील (Dynamic) स्वरुपाचे असून त्यामध्ये नागरिकांना खालील नवीन स्वरुपात माहिती प्रसिद्ध करण्याच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
1. Consumer Awareness
2. Consumer Awareness Programmes
3.Guidence for food industry
4.Online Complaint.
तसेच अन्न विभागामार्फत अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत घेण्यात सर्व आलेल्या कारवाईंची माहिती ऑनलाईन कार्यपद्धतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सदरच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये अन्न विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना लॉग इन उपलब्ध करुन देण्याचे व कार्यवाहीबाबतची कागदपत्रे साक्षांकित करण्याकरिता डिजिटल सहीचा वापर करण्यात आला आहे. सदरच्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन कार्यवाहीबाबतची संपूर्ण माहिती तात्काळ वरिष्ठांना तसेच मुख्यालयापर्यंत उपलब्ध होणे शक्य होईल. तसेच अन्न विभागाचे कामकाज गतिशील होऊन सर्वसामान्य नागरिकांना कामकाजाबाबत सहजरित्या माहिती उपलब्ध झाल्याने पारदर्शकता वाढेल.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे सुरक्षित व पौष्टिक आहारबाबतचे विशेष उपक्रम
1) पिंक बुक
The Pink Book : Your Guide for Safe and Nutritious Food at Home.
सदर पुस्तक हे विशेषत: भारतीय घरांतील स्वयंपाक सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक होण्याच्या दृष्टिकोनातून तयार केले आहे.
2) यलो बुक
Safe and Nutritious Food at School.
यलो बुक हे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पदार्थाचा आपल्या रोजच्या जीवनात कसा अवलंब करता येईल यावरील मार्गदर्शन पुस्तिका आहे.
3) ऑरेंज बुक
Safe and Nutritious Food at Workplace
कामाच्या ठिकाणी अन्न सुरक्षिततेबाबत जागृती होण्याच्या दृष्टीने ऑरेंज बुकच्या माध्यमातून कार्यालयातील व्यवस्थापकांनी व तेथील उपहारगृह चालकाने तसेच स्वत: कर्मचाऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी जेणेकरुन तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास सुरक्षित व पौष्टिक आहार मिळण्यास मदत होईल याबाबतची माहिती दिलेली आहे.