Published On : Sat, Mar 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

शिकारीकरीता लावण्यात आलेला तार अडकला वाघाच्या गळ्यात

Advertisement

पांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या ताराच्या जाळ्यात एक वाघ अडकला. मात्र त्या वाघाने तो जाळ तोडुन पळ काढला. पण त्यात त्या वाघाच्या गळ्यात जाळ्याची तार गळ्यात अडकली असुन तो वाघ त्यात जख्मी झाला आहे. गळ्यात अडकलेली ती तार घेवुन जख्मी अवस्थेत तो वाघ अभयारण्यात फिरत असुन त्या वाघास पकडण्याकरीता टिपेश्वर अभयारण्यात अमरावती येथील रेस्क्यु पथक सुमारे आठ दिवसापासुन गस्त घालत आहे.

टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची नेहमीच शिकाऱ्याव्दारे शिकार करण्यात येत असते. अभयारण्य प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे सतत वन्य प्राण्यांची शिकार अभयारण्य परिसरातील गावात सुरुच असुन वन्य प्राण्यांच्या शिकार करुन त्यावर ताव मारण्याची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठ दिवसाआधी एका पर्यटकास अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसुन आले. याची माहिती टिपेश्वरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये सुध्दा एका वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसुन आल्याची माहिती आहे. गळ्यात तार अडकल्याने तो वाघ जख्मी झाला असुन त्याला पकडण्याकरीता अमरावती येथुन रेस्क्यु पथकास पाचारण करण्यात आले आहे. टिपेश्वरच्या पाटणबोरी रेजंमधिल ऐदलापुर व पिलखान बिट मध्ये सदर जख्मी वाघ आढळुन आला होता. त्याचा वावर सुध्दा या दोन बिट मध्ये दिसुन येत आहे. परंतु तो अभयारण्याच्या अधिकारी, कर्मचारी तथा रेस्क्यु पथकाच्या हाती लागत नाही आहे. टिपेश्वर अभयारण्य किंवा लगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्याच्या शिकारीकरीता लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात तो वाघ अडकला. हि बाब एका पर्यटकाच्या लक्षात आल्याने अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरु केल्या.

याआधी सुध्दा टिपेश्वर मधिल वाघ शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकुन त्यांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडलेल्या आहे. १७ मार्च २०१९ रोजी शिकाऱ्याचा तार गळ्यात अडकलेल्या टि-४ या जख्मी वाघिणीस बेशुध्द करण्याकरीता ट्रग्युलायझर गणव्दारे डॉट मारण्यात आला होता. परंतु ति बेशुध्द होण्याआधीच तिला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्या जख्मी वाघीणीने आश्विन बाकमवार व ईरफान शेख या दोन मजुरावर हल्ला केला होता. यावेळी त्यांना वाचविण्याकरीता त्या जख्मी वाघिणीच्या तोंडावर बूक्क्याचा मार उपस्थितांनी मारल्याने तिचा मृत्यु झाल्याचे त्यावेळी बोलल्या जात होते.

राजकीय दबावापोटी त्याची चौकशी सुध्दा त्यावेळी थंडबस्त्यात ठेवण्यात आली होती. ती जख्मी वाघिणी सुमारे सहा महिणे गळ्यात तार अडकल्याने जख्मी अवस्थेत अभयारण्यात फिरत होती. तिला योग्य वेळी उपचार मिळाला नव्हता. गेल्या आठ दिवसाआधी तार अडकल्याने जख्मी झालेल्या वाघाबाबत सुध्दा तसाच काही प्रकार घडु नये यासाठी त्याचा लवकरात लवकर शोध घेवुन त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे.

योगेश पडोळे
प्रतिनिधी पांढरकवडा

Advertisement
Advertisement