नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई -मेल सोमवारी आल्याने खळबळ उडाली. आता तपासदम्यान हा ई -मेल जर्मनीहून आल्याची माहिती समोर आली.
या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.धमकीचा मेल सोमवारी सकाळी ९.४५ वाजता विमानतळ संचालकाला आल्यानंतर विमानतळ व्यवस्थापन आणि प्रशासनाने तातडीने तपासाच्या हालचाली सुरु केल्या.संशयितांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई -मेल आल्यानंतर सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाचा शोध मोहिमेत समावेश होता.
तपासणीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी अशाच धमकीचे मेल नागपूरसह जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ व्यवस्थापनालाही आले. या मेलमध्ये विमानतळांवर बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती.