Published On : Wed, Jan 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला ; मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर ठाम

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहे. सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) फेटाळला आहे.त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कामाला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. विभागीय आयुक्त यांच्या शिष्टमंडळाला देखील त्यांनी आपली भूमिका बोलून दाखवली.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुण्यात आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ही लक्षणीय होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा बांधवांनी पाठिंबा दिला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘हा’ आहे सरकारचा तीन कलमी प्रस्ताव-
54 लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचे मान्य व्हावे.
गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे. म्हणून मुंबईचा दौरा टाळा असेही आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

Advertisement
Advertisement