Published On : Sat, Oct 27th, 2018

जुनिकामठी ला महाराजस्व अभियान शिबीर संपन्न.

कन्हान : – महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसुल विभागा अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्‍न सत्वर निकाली काढण्या साठी सन २०१७-१८ शासन आपल्या दारी या धरतीवर महाराजस्व अभियानाचे आयोजन करून १००% लाभ देण्याकरिता गावपातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रदीपकुमार आडे यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि.२६ ऑगस्ट २०१८ ला जुनिकामठी येथे एक दिवसीय महाराजस्व शिबीर संपन्न झाले.

तहसिल कार्यालय पारशिवनी व्दारे ग्राम पंचायत जुनिकामठी येथे मा.जोगेंद्र कटयारे साहेब उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसिलदार मा.वरूनकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मा. प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात महाराजस्व अभियान २०१८ दि.२६ ऑक्टोबर २०१८ ला सकाळी ११ ते ५ वाजे पर्यंत राबविण्यात आले. यात जुनिकामठी ग्राम पंचायतीच्या नागरिकांना ७/१२ वाटप – २६ , ८अ- १४, वारस फेरफार- ९ , सुविधा केंद्र उत्पन्न दाखले – ७५ , संजय गांधी योजना -२ , श्रावणबाळ योजना – २२ , ग्राम पंचायत विभाग विवाह नोदणी प्रमाणपत्र -०७, ग्रा.प रहिवासी प्रमाणपत्र – ४२ , तलाठी उत्पन्नाचे दाखले – ३७, जातीचे प्रमाणपत्र (सेतु) ऑनलाईन – ३२ , उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सेतु) ऑनलाईन – ३०, शपतपत्र – ३२, राष्ट्रीयत्व प्रकरणे – २८, शिधापत्रिका नाव कमी /जास्त करणे प्रकरण – ६७ , नविन शिधापत्रिका – ०९, दुय्यम शिधापत्रिका -१५ , पोलीस पाटील प्रमाणपत्र – ११, सेतु केन्द्राकडे ३२ आधारकार्डची अपडेट – ३३, नोंदणी – ६० करण्यात आली.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तुषार ठिंबक बाबत मार्गदर्शन, गुलाबी बोंडअंळी व्यवस्थापन परिपत्रक वाटप व मार्गदर्शन – २५ , कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत एच डी पी इ पाईप अर्ज वाटप – २४, किटकनाशके फवारणी करतांना घ्यायावयाची काळजी परिपत्रके वाटप व मार्गदर्शन, मा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मार्गदर्शन व अर्ज वाटप – २४, मागेल त्याला शेततळे माहीती, मार्गदर्शन व अर्ज – १० वाटप करून नागरिकांना लाभ देण्यात आला .

ग्राम पंचायत जुनिकामठी येथे महाराजस्व अभियान २०१८ यशस्वी करण्यात आले. या शिबिराचा गावातील मोठय़ा संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबीरांच्या यशस्वीते करिता नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे, सं गां यो विभाग – श्री आर बी लुटे , तलाठी – एन पी गिरडकर, एन पी श्रीरसागर, पुरवठा अधिकारी कु. तितीशा बारापात्रे , मेहर , निवडणूक विभागचे सहारे , कृषी पर्यवेक्षक थेरे , कृषी सहाय्यक झोड, आरोग्य विभाग भोसरकर, दुबळेकर, पराते, आरोग्य सेवक वालदे , आरोग्य सेविका , सेतु केंद्र प्रशांत कारोडे, आधार कार्ड उईके , कोतवाल- बंडु वानखेडे , चंद्रमणी वाहाणे , राऊल, पोलीस पाटील – बाजीराव इंगोले , सरपंच – मोहन खंडाते उपसरपंच – भुषण इंगोले , सर्व ग्राम. पचायत सदस्य, सचिव – देशभ्रतार, ग्रा.प. कर्मचारी व शाशकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Advertisement