कन्हान : – के डी के कॉन्व्हेंट टेकाडी येथे छोटयाशा विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करित पाल कांना, उपस्थितांना मंत्रमृग्ध करून स्नेह संम्मेलन थाटात संपन्न करण्यात आले.
स्नेह संम्मेलनाचे शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षेत व अँड संदीप अढाऊ, अँड सचिन राऊत, ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, महामार्ग पोलीस उपनिरिक्षक खांदारे, जेष्ठ नागरिक भाऊरावजी कांब ळे, ग्रा प सदस्य दिनेश चिमोटे, सुखदेव जी भिवगडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तदनंतर चिमुकल्या छोटयाशा विद्यार्थ्यांनी देशभक्ती, समुह गित, शालेय गितावर नुत्य, वेशभुषा स्पर्धा व नकल अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी डॉ उमेश राहंगडाले, धनराज राऊत, ग्राम विस्तार अधिकारी मा रानडे, पत्रकार कमलसिंह यादव, रविंद्र दुपारे, किशोर वासाडे, सतिश घारड, सतिश कुरडकर, संजय राऊत, कार्तिक मोहाडे, कमलाकर राऊत, नितीन वानखेडे, सुर्य भान टाकळखेडे, रतन कांबळे, यशवंत कडु, चंद्रशेखर कुरडकर, भोजराज उमप, सुधाकर सावरकर, अनुपम राऊत, रामायण प्रसाद, बेनीमाधव सिंग,रूपाली मोहाडे, मैनाबाई कांबळे, अर्चना कुरड कर, कविता कांबळे, शोभा बेलदार, रेखा सिंग, प्रणाली कुरडकर, वासाडे ताई, बबिता प्रसाद, सावरकर ताई, उमप ताई आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन दिपाली वझेकर यांनी तर आभार सुरेखा कांबळे यांनी मानले. यशस्वीते करिता मुख्याध्यापिका मनिषा कांबळे , निशा देशमुख, सुरेखा हिंगे, रिना किशोर, अर्पणा गजभिये, रिता चव्हाण, हर्षदा हुड, अंबादास सातपैसे आदीने परिश्रम घेतले.