– शेतकर्यांनी मांडल्या शरद पवारांसमोर व्यथा,आज शरद पवार विदर्भ दौर्यावर
नागपूर -सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. कोणी पाहणी करायला आले नाही. पिकाला भाव नाही. अशा व्यथा हवालदिल झालेल्या काटोल येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आज मांडल्या.
नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आज शरद पवार यांनी भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज विदर्भातील नागपूर दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी काटोल विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
सत्ता स्थापन होणार की नाही या विवंचनेत अख्खा महाराष्ट्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर पोचले आहेत.
नागपूर हे संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेच पीक संकटात आले आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतावर जात शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.