कन्हान: श्री महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान व्दारे प्राचिन जागृत श्री महाकाली मंदीर सत्रापुर कन्हान येथे श्री महाकाली चैत्र नवरात्र महोत्सवाची भव्य महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
पावन कन्हान नदीच्या काठावरती प्राचिन जागृत श्री महाकाली तिर्थस्थळ सत्रापुर कन्हान येथे दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी गुरुवार २२ ते शुक्रवार दि. ३० मार्च २०१८ पर्यत श्री महाकाली चैत्र नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन चैत्र शुक्ल पचमी गुरुवार २२ मार्च ला सकाळी पुजा अर्चनासह घटस्थापना करून महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
सकाळी व सायंकाळी ७ वाजता पुजा अर्चनासह आरती, नऊ दिवस भजन, जस व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून चैत्र शुक्ल १४ शुक्रवार दि. ३० मार्च २०१८ ला सायंकाळी ५ वाजता पावन कन्हान नदीत घटविसर्जन करून सायंकाळी महाप्रसाद वितरण करण्यात आले. तर या महाप्रसाद व पर्वाला मंदिराचे व्यवस्थापक श्री उत्तमराव दुरूगकर महाराज सह श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी तीन खंबा चौक, नागपूर यांच्या मार्गदर्शनात श्री महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान व भक्तगण द्वारे विशेष सहयोग करण्यात आला .