Published On : Fri, May 19th, 2017

रेल्वे स्थानकावरील अस्वच्छतेची घेतली महापौरांनी गंभीर दखल

Advertisement


नागपूर
: अस्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासनाने कडक धोरण ठरवायला हवे. नागपूर महानगरपालिकेसोबत समन्वय ठेवून रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. रेल्वे रुळावर शौचास बसणाऱ्या लोकांवर रेल्वे पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यात.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपुरात सध्या सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेचा आणि रेल्वे प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर कक्षात यासंदर्भात बैठक पार पडली.

सदर बैठकीला सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ डीइएन (सीओ) भावेशकुमार झा, वरिष्ठ विभागीय मुख्य व्यवस्थापक के.के. मिश्रा, वरिष्ठ डीएमई परवेश साहू यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेल्वे अधिकाऱ्यांनी महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छतेसंदर्भात काय केले जात आहे, याबद्दल माहिती दिली. रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या अडचणी ऐकल्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी रेल्वे विभाग आणि मनपा यांच्या समन्वय असल्याशिवाय कुठलेही काम शक्य नसल्याचे सांगितले. रेल्वे स्थानक परिसरात असलेला वाहतुकीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढील बैठकीत वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी बोलविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उघड्यावर शौच करणाऱ्यावर महानगरपालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे परिसरात, रेल्वे रूळावर आजूबाजूच्या वस्तीतील लोकं शौचाला बसतात. त्यांच्यावर रेल्वे पोलिसांच्या मदतीने रेल्वे अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करावी, स्वच्छ भारत अभियानातील मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही महापौर नंदा जिचकार यांनी दिल्या.

स्वच्छ स्थानकांना भेटी द्या!

मी महापौर या नात्याने चांगले घेण्याच्या प्रयत्न करते. ज्या महानगरपालिका स्वच्छतेत आघाडीवर आहेत, जेथे काहीतरी अभिनव प्रयोग सुरु आहेत, अशा महापालिकांना मी स्वत: भेटी देते. आपणही स्वच्छतेत आघाडीवर असलेल्या रेल्वे स्थानकांना भेटी द्या. त्यांनी काय चांगले केले, त्याची अंमलबजावणी नागपूर स्थानकावर करा, असा सल्लाही महापौर नंदा जिचकार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

Advertisement
Advertisement