Published On : Mon, May 3rd, 2021

हनुमाननगर झोनमधील फिरत्या कोव्हिड चाचणी केंद्रांना महापौरांनी दिली भेट

व्यवस्थेची केली पाहणी : चाचणीसाठी नागरिकांना आवाहन

नागपूर : हनुमाननगर झोनमधील धोकादायक भागातील नागरिकांच्या चाचणीला रविवारी सुरुवात झाली. मनपाचे १० फिरते चाचणी केंद्र दोन दिवस झोनमधील नागरिकांच्या चाचणीसाठी तैनात आहेत. झोनमधील विविध भागात सुरू असलेल्या या चाचणी केंद्रांना रविवारी (ता.२) महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट दिली. याप्रसंगी झोन सभापती कल्पना कुंभलकर, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, सतीश होले, नगरसेवक अभय गोटेकर, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, डॉ. बकुल पांडे उपस्थित होते.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविवारी हनुमान नगर झोनमधील १५ ठिकाणी १३९६ जणांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात करण्यात आली.

महापौरांनी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. सेवारत असलेल्या मनपाच्या आरोग्य पथकाशी संवाद साधून त्यांना काही अडचणी आल्यास तात्काळ माहिती देण्याची सूचना केली. याशिवाय परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

हनुमान नगर झोन मधील वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांनी तातडीने सर्व नागरसेवकांसोबत बैठक घेऊन झोन मधील रेड झोन मध्ये चाचणी करण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशानुसार रविवारी (ता.२) सकाळी चाचणीला सुरुवात झाली. रविवारी आणि सोमवारी (ता.३) दोन्ही दिवस हनुमान नगर झोनच्या सर्व रेड झोन मधील नागरिकांची चाचणी केली जाणार आहे.

हनुमान नगर झोनमधील महालक्ष्मी नगर, ,प्रभात नगर, कॉर्पोरेशन कॉलनी, ,चंद्रभागा नगर हुडकेश्वर, स्वागत नगर लेआऊट, कामगार कल्याण, गांधी पुतळा शाहू समाज भवन, चंदन नगर क्रीडा चौक, गणेश नगर, एम.एस.ई.बी. वाचनालय न्यू सुभेदार लेआऊट, सच्चीदानंद नगर समाजभवन चिखलकर महाराज मठाजवळ, चक्रधर नगर, विश्वकर्मा नगर, विठ्ठल नगर, कल्यानेश्वर नगर, महात्मा फुले कॉलनी, आकाश नगर या सर्व भागामध्ये दोन दिवस चाचणी अभियान राबविण्यात येत आहे.

आज रविवारी हनुमान नगर झोनच्या सभापती कल्पना कुंभलकर यांच्यासह झोनमधील नगरसेवक सर्वश्री सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, अभय गोटेकर, भगवान मेंढे, राजेंद्र सोनकुसरे, दीपक चौधरी, नागेश मानकर, नगरसेविका उषा पॅलेट, स्वाती आखतकर, विद्या मडावी, लीला हाथीबेड, शीतल कामडे, माधुरी ठाकरे, रुपाली ठाकूर, मंगला खेकरे या सर्वांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना चाचणीसाठी प्रोत्साहित करून त्यांना केंद्रावर आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. सर्व नगरसेवक तथा नगरसेवकांच्या सहकार्याने सोमवारी सुद्धा लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

Advertisement