Advertisement
फक्त १ लाख विसर्जन कुत्रिम तलावात
नागपूर : नागपुरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी महापौर मेडिकल, मेयो, एम्सच्या डॉक्टरांसह शहरातील काही प्रमुख डॉक्टरांसोबत गुरुवारी (ता. ३) चर्चा करणार आहेत.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात दुपारी ४ वाजता सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कोव्हिडची सद्यस्थिती लक्षात घेता भविष्यात काय प्रभावी उपाययोजना करता येतील, त्यादृष्टीने कसे नियोजन करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. बैठकीत होणाऱ्या चर्चेच्या आधारावर कोव्हिड-१९ या विषाणूशी लढण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येतील. बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह मेडिकल, मेयो एम्सचे अधिष्ठाता आणि शहरातील काही नामवंत डॉक्टर्स उपस्थित राहतील.