Published On : Tue, Jun 5th, 2018

राष्ट्रवादीच्या बॅनरवर छगन भुजबळ इन; धनंजय मुंडे मात्र आऊट!

Advertisement

पुणे : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा राष्ट्रवादीच्या स्थापना दिवशी म्हणजेच येत्या दहा जून रोजी पुण्यात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. राज्यातील पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनर्सवर छगन भुजबळ इन तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आऊट झाल्याचं बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या सांगता सभेचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे आणि वंदना चव्हाण यांचे फोटो दिसत आहेत. मात्र राज्यभरात राष्ट्रवादीने केलेल्या हल्लाबोल आंदोलनात सक्रिय राहिलेले धनंजय मुंडे यांची भाषणं चांगलीच गाजली होती. मात्र सध्या तेच बॅनरवरुन गायब असल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहे.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या वर्षी डिसेंबरपासून राष्ट्रवादीने सरकाराच्या विरोधात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली होती. नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भात पदयात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दखल घ्यायला लावली होती. त्यानंतर मराठवाड्यात ,उत्तर महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आल्यानंतर पक्षाच्या बालेकिल्यात पश्‍चिम महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात आले होते.

Advertisement