Published On : Thu, Apr 7th, 2022

नागपूर मेट्रो यात्रींची संख्या ४५,००० च्या वर

Advertisement

वाढणाऱ्या तापमानात वातानुकूलित सेवेचा नागपूरकर घेत आहेत लाभ

नागपुर: नागपूर मेट्रो ट्रेन ने यात्रा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि एक्वा मार्गिकेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या ४५,००० च्या पलीकडे गेली आहे. उल्लेखनीय आहे की कोरोना च्या आधी नागपुर मेट्रो ने यात्रा करणाऱ्यांची संख्या ६०,००० च्या वर गेली होती. परिस्थिति ज्या प्रमाणे सामान्य होते आहे त्याच प्रमाणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. महामेट्रो च्या रिच-२ (कामठी मार्ग) आणि रिच -४ (सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील) मेट्रो मार्गिकेवर यात्री सेवा प्रारंभ झाल्यावर हा आकडा एक लाखाच्या वर जाईल.

Advertisement

यात्रींना मिळत आहेत सोइ
नागपुरातील वाढत्या तापमानात मेट्रोने प्रवास सुखकारक ठरतो आहे. कस्तुरचंद पार्क ते खापरी मेट्रो स्टेशन आणि लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान रोज सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजे पर्यंत प्रत्येक १५-१५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे. किमान रुपये ५ आणि कमाल रुपये १० प्रवास भाडे असल्याने नोकरी करणारे, व्यापारी, कॉलेज और शालेय विद्यार्थी सर्वाधिक संख्येने मेट्रो चा उपयोग करीत आहेत. मेट्रो में सायकल नेण्याची सोय असल्याने मेट्रो स्टेशन पर्यंत सायकिलने आणि तत्पश्चात सायकल ने आपल्या गंतव्यापर्यंत मेट्रो प्रवासी जातात.

अतिशय कमी किमतीत सुयोग्य सेवा महामेट्रो तर्फे उपलब्ध झाली आहे. याच प्रकारे लास्ट माइल कनेक्टिविटी अंतर्गत फिडर सेवा देखील प्रदान केली आहे. खापरी मेट्रो स्टेशन येथून मिहान आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा, राजापेठ, इतर भागाकरिता मेट्रो स्टेशन येथून फीडर सेवा असल्याने ग्रामीण भागातील राहिवाश्यांना आवागमनाची चांगली सोय उपलब्ध झाली आहे.

प्रवास झाला सोपा
पेट्रोल पदार्थांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीचा परिणाम आता जाणवू लागला आहे. खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी प्रवास करण्या पेक्षा मेट्रो प्रवासाकडे सर्व सामान्यांचा कल वाढत आहे. शिवाय वाढत्या तापमानामुळे देखील मेट्रोचा प्रवास नागपूरकरांना सोयीचा झाला आहे. महा मेट्रोच्या रिच-२ आणि रिच-४ मार्गिकांवर प्रवासी सेवा लौकरच सुरु होणार आहे. या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली कि नागपूरकर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशेला अतिशय सहजपणे मेट्रोच्या माध्यमाने आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकतील. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता सर्व चारी मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली कि मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखांचा आकडा पार करेल हा विश्वास आहे.