Published On : Mon, Feb 8th, 2021

महा मेट्रोची प्रवासी संख्या २७,००० पार

– रविवारी गाठली दुसरी सर्वात जास्त रायडरशिप

नागपूर – गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढणाऱ्या महा मेट्रोच्या रायडरशिप ने या रविवारी परत एकदा भरारी घेतली असून मागील सर्व रविवारचे विक्रम मोडत २७,००० चा आकडा पार केला आहे. या रविवारची एकूण रायडरशिप २७,२२४ इतकी असून २६ जानेवारी नंतर हि दुसरी सर्वात जास्त प्रवासी संख्या आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपूरकरांनी महा मेट्रो ने मोठ्या प्रमाणात राईड करत ५६,४४१ पर्यंत मजल मारत महा मेट्रोला ऐतिहासिक आणि विक्रमी रायडरशिप मिळवून दिली होती.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोव्हीड मुळे थांबलेली महा मेट्रोची प्रवासी सेवा गेल्या वर्षी सुरु झाल्या नंतर महा मेट्रोने सातत्याने रायडरशिप वाढवण्याकरता प्रयत्न केले आहेत, या करता विविध योजना देखील राबवल्या आहेत. याच अंतर्गत मेट्रो गाडीत सायकल नेण्याची परवानगी देणे, स्टेशनवर विविध वस्तूंचे स्टॉल लावणे, विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयॊजन करणे, सेलिब्रेशन ऑन व्हील्स सारखे उपक्रम राबवणे असे अनेक आणि विविध उपाय केले आहेत. याच सर्व प्रयत्नांचा आणि उपक्रमांचा संयुक्तिक फायदा महा मेट्रोला झाला असून आता प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे.

२५ डिसेंबरला नाताळाच्या आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास महा मेट्रो स्थानकांवर अनेक विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यामुळे मेट्रो स्टेशनला कार्निव्हलचे रूप प्राप्त झाले होते. विशेषतः सीताबर्डी इंटरचेंज स्थानकावर तर विविध प्रकारचे स्टॉल्स सोबत देशभक्तीपर आणि इतर गाण्याच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित सातत्याने निर्देश देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महा मेट्रोची प्रवासास संख्या वाढत आहे.

रायडरशिपचा वाढता आलेख पुढील प्रमाणे:
२६.०१.२०२१ रोजी रायडरशिप – ५६,४४१
०७.०२.२०२१ रोजी रायडरशिप – २७,२२४
३१.०१.२०२१ रोजी रायडरशिप – २४,७१४

Advertisement