मुंबई : राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आज दुसरा दिवस आहे. कालच्याप्रमाणे आजही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावंर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, “मंत्री तुपाशी, जनता उपाशी” यासंह अनेक घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येते आहे. आजच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही आहेत. विरोधकांची संख्या कमी असली तरीही आम्ही एकजूट आहोत, असा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान विधानसभेत काल कामकाज सुरु झाल्याच्या अर्ध्या तासातच कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे आज विविध मुद्द्यांवरून विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपा नेता किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे हा मुद्दा आज विधानसभेत विरोधकांकडून मांडण्यात येणा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.