नागपूर: शहरातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा जीव गेला. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचा मालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक केली आहे.
काल १३ जून रोजी धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत दुपारी दीडच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटात पन्नालाल बंदेवार, शीतल आशीष चटक, प्रांजली श्रीकांत फलके, वैशाली आनंदराव क्षीरसागर, मोनाली शंकर अलोने, प्रांजली किसन मोदरे यांचा मृत्यू झाला. तर प्रमोद मुरलीधर चवारे, श्रद्धा वनराज पाटील, दानसा फुलनसा मरसकोल्हे हे गंभीर जखमी झाले.पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुराग बंदेवार (२८) याने या प्रकरणात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जय शिवशंकर खेमका व सागर देशमुख यांच्याविरोधात कलम २८६, ३०४-अ व ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कंपनीत गनपावडर पासून सेफ्टी फ्युज व मायक्रोकॉर्डचे उत्पादन केले जात होते.