Advertisement
नागपूर : भर पावसात ढोल, ताशांबरोबरच डीजेवर थिरकत..लाल पिवळ्या,भगव्या, गुलाबी गुलालाची मुक्त उधळण करत आज नागपुरच्या जगनाथ बुधवारीपासून इतवारी, गांधीबाग, महाल भागातील रस्त्यांवर नागपूरकरांची झालेली अमाप गर्दीत मारबत उत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला.
जगनाथ बुधवारी येथून निघालेली पिवळी मारबत आणि इतवारीच्या बारदाणा मार्केटमधून निघणारी काळी मारबत यांचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर ऐतिहासिक मिरवणूक निघाली. या मारबतीसोबतच सामाजिक संदेश देणारे बडगे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महागाई, भ्रष्टाचार, रोगराईला ‘घेऊन जा गे मारबत’ अशा घोषणा यादरम्यान तरुणाईने दिल्या.
देशविदेशात चर्चा व वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास १४३ वर्षांची परंपरा लाभली आहे. संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपूरातच साजरा केला जातो,हे विशेष.