पुणे:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. यातही बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होती. यात सुप्रिया सुळे यांचा बहुमताने विजय झाला. या विजयानंतर आज पुण्यात सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर प्रतिक्रिया दिली.
राज्यात महागाई आणि बेरोजगारीचे संकट आहे.राज्यातील जनतेनं दडपशाहीला नाकारले आहे. माझ्या स्वागतासाठीचे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी द्या.बारामतीचा विजय हा मतदारांचा आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे, असे सुळे म्हणाल्या.
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. आता लोकसभा निवडणूक निकालांनंतर त्यांचा निर्णय चुकल्याचं पुन्हा एकदा बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता निकालांनंतर अजित पवारांना काय सल्ला देणार? असा प्रश्न पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हात जोडून उत्तर दिले.
मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे.आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो,त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो,असे सुळे म्हणाल्या.