Advertisement
नागपूर : पगारवाढीच्या मागणीसाठी आपली बसचे चालक आणि वाहक बेमुदत संपावर आहेत. संपामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. बसेस धावत नसल्याने ऑटोचालक मनमानी भाडे आकारत आहेत.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
संप मिटवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्या सर्वच निष्फळ ठरल्या आहेत.