नागपूर: काँग्रेसच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त आज गुरुवार, २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘है तैयार हम’ महारॅलीसाठी पक्षाच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सभेसाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. सभास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कॉंग्रेसच्या दिघोरी नाक्याजवळील मेदानात होणाऱ्या सभेसाठी देशभरातील पक्षाचे दिग्गज नेते हजेरी लावत आहे. सभास्थळी ४ पोलिस उपायुक्त, ४ सहायक पोलिस उपायुक्त, ८ पोलिस निरीक्षक यांच्यासह ४५० पोलिसांची सभेवर करडी नजर असेल.
सभेच्या ठिकाणी तसेच उमरेड मार्गावर वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तांसह १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच १७४ वाहतूक पोलीस लक्ष ठेवून आहेत.