Advertisement
नागपूर: कुही पोलीस स्टेशन (नागपूर ग्रामीण) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे व उपनिरीक्षक संजय चव्हाण यांना एका हॅाटेलव्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी २ लाख रु.ची लाच घेताना नागपूर ॲंटी करप्शन ब्युरोने पकडले.
तक्रारदार यांनी आज दुपारी नागपूर ॲंटीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना भेटून तक्रार दिली होती. त्यांनी तात्काळ दखल घेऊन डी.वाय.एस.पी. मिलींद तोतरे यांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
नागपूर ॲंटीकरप्शन ब्युरोने आज दिवसभरात याव्यतिरिक्त भंडारा व गडचिरोली येथेही दोन लाचखोरांना पकडले. यात एका सेक्शन इंजिनियरचा समावेश आहे.
आजच्या या तिसऱ्या कारवाईतील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.