Advertisement
नागपूर: नागपुरातील सीताबर्डी परिसरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली.आज शुक्रवारी पोलीस नियंत्रण कक्षाला मोदी क्रमांक ३ अमृत प्लाझा येथून सीताबर्डी परिसरात बॉम्ब असल्याबाबतचा फोन आला. मात्र, हा कॉल फेक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
तरी देखील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत बीडीडीएस आणि सीताबर्डी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र परिसरात त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, पोलिस कॉल नेमका कुणी केला याचा शोध घेत आहेत.
देशभरात खळबळ उडवून देणारे असे बनावट बॉम्ब कॉल्स येणे यात नवीन काहीही नाही.
अलीकडे, अशा घटनांमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे.