Published On : Tue, Jan 22nd, 2019

विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

Advertisement

शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे

मुंबई : राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होतील आणि किमान २९ जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहतील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे दि. २५ ते २७ जानेवारी या काळात काही प्रमाणात धुकं पडेल. या दरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील.

शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement