Published On : Fri, Aug 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक बळकट होणार – मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके

Advertisement

नागपूर: आर्थिकदृष्टया सक्षम आणि कार्यक्षम वितरण प्रणाली विकसित करणे, ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करणे आणि वीज हानी कमी करून विज पुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारणाच्या दृष्टीने केंद्र शासनातर्फ़े राबविण्यात येत असलेल्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत नागपूर जिल्ह्यात वीजहानी कमी करणे आणि वाहिनी विलगीकरण अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु झाली असुन आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत ही सर्व कामे पुर्ण करून नागपूरकरांना गुणवत्तापुर्वक वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याचा मानस नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी व्यक्त केला आहे.

या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 205 वीज वाहिन्यांचे विलगीकरण आणि वीजहानी कमी करण्यासाठीच्या निविदा प्रक्रीया पुर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात देखील झाली आहे. यात 11 केव्ही वाहीनींचे जिल्ह्यात एकूण 163 बे, 3061.50 किमी लांबीच्या 11 केव्ही उपरी वाहीन्या, 218.05 किमी लांबीच्या 11 केव्ही भुमिगत वीज वाहीन्या, 1519 नवीन वीज वितरण रोहित्रे, 544.54 किमी लांबीच्या लघुदाब वितरण वाहिन्या, 190 विशेष रोहीत्रे (स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर), 85 किमी लांबीच्या उच्चदाब एरियल बंच केबल आणि 205 वीज वाहिन्यांचे विलगीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय वीज हानी कमी करण्यासाठी जिल्ह्यात 135 किमी लांबीच्या 33 केव्ही उपरी वाहीनीची क्षमता वाढ, 256 किमी लांबीच्या 11 केव्ही उपरी वाहीनीची क्षमता वाढ, 11 किमी लांबीच्या लघुदाब उपरी वाहिनीची क्षमता वाढ 18 किमी लांबीच्या33 केव्ही उपरी वाहिन्या, 168.य किमी लांबीच्या 11 केव्ही उपरी वाहिन्या आणि 114 किमी लांबीच्या 11 केव्ही भूमिगत वाहिन्यांचे विलगीकरण करण्यासोबतच 16 ठिकाणी फ़िडर बे बसविणे सोबत उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत 121.2 किमी लांबीच्या उच्चदाब वाहिन्या, 459 ठिकाणी वितरण रोहित्रे, 721.3 किमी लांबीचे लघुदाब आमार्ड केबल टाकणे, 1376.2 किमी लांबीचे लघुदाब एरियल बंच केबल टाकणे आणि 50 ठिकाणी कॅपेसिटर बॅंक बसविण्याची कामे प्रस्तावित असून या कामांना सुरुवात झाली असल्याची माहिती देखील श्री दोडके यांनी दिली.

या कामांसोबतच रिॲक्टीव पॉवर मॅनेजमेंट च्या कामा अंतर्गत जिल्ह्यातील 12 उपकेंद्रांमध्ये कॅपेसिटर बॅंक बसविण्याच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले असून सुधारीत वितरण क्षेत्र योजने अंतर्गत स्मार्ट मिटरींग आणि विद्युत यंत्रणा सक्षमीकरणाची कामे देखील प्रस्तावित आहे यापैकी स्मार्ट मिटरींगच्या कामांची निविदा प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या कांना लवकरच सुरुवात होणार असून ही कामे झाल्यानंतर जिल्हावासियांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करण्यास महावितरण अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास देखील श्री दिलीप दोडके यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement