नागपूर: उमरेड तालुक्यातील बेला येथील निवासी वीज ग्राहकांना मागील काही दिवसापासून भेडसावणारी सिंगल फेसची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. परिणामी या परिसरात पुरेसे अर्थिंग मिळत नसल्याने सिंगल फेसची समस्या निर्माण झाली आहे. आज उमरेड येथील महावितरणचे उप कार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी पुरेसे अर्थिंग मिळत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. परिसरातील गावकऱ्यांना विश्वासात घेऊन राऊत यांनी वस्तुस्थिती अवगत करून दिली. तसेच पुरेसे अर्थिंग मिळावे यासाठी ठरविक ठिकाणी गावकऱ्यांकडून पाणी जमिनीत टाकल्यास सिंगल फेसची समस्या निकाली निघेल असे स्पष्ट सांगितले. गावकऱ्यांनी आनंदाने हे काम करण्याची तयारी दाखवली.
या शिवाय चारगाव परिसरातील वितरण रोहित्र महावितरणकडून मंगळवार दिनांक ३ एप्रिल रोजी बदलण्यात आल्याने या परसातील वीज ग्राहकांची समस्या दूर झाली आहे . बेला शाखा कार्यालयात ६ जनमित्र कार्यरत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.