रायगड : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. या धक्कादायक घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ५० ते ६० जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरूच आहे. एनडीआरएफने सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली आहे. आज दिवसभर बचावकार्य चालणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहेत. तिथे २० फुटांचा ढिगारा आला आहे. तो तिथून हटवणं फार कठीण असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळपासून पाऊस उघडल्याने बचाव पथकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या भागात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बचावकार्यामध्ये आजही दिवसभर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.
इर्शाळगडावर अडकलेल्या मुक्या प्राण्यांसाठी सरसावले अनेक हात
इर्शाळवाडीतील घटनास्थळाची ड्रोन Video