Advertisement
मुंबई: नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेनुसार मौजा धंतोली येथील भूखंड खेळाच्या मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी तो आवश्यक असल्याने आरक्षणात फेरबदल करून तो वाणिज्य वापरासाठी खुला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मौजा धंतोली येथील खसरा क्रमांक 98 ते 101, सि.स. क्र.9 क्षेत्र 19889.90 चौरस मीटर क्षेत्र खेळाच्या मैदानामधून वगळण्यात येत असून ही वगळलेली जागा मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या वाणिज्य वापरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सोय होणार असून या प्रकल्पाशी संबंधित कामाला गती मिळणार आहे.