Advertisement
नागपूर: केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प बळीराजा, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांच्या दृष्टीने आशादायक चित्र दाखविणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे मुद्रा योजनेचा युवकांना फायदा होणार आहे. समाजातील सर्वच घटकांचा विचार करून मांडलेला हा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या सर्वोत्तम अर्थसंकल्पापैकी एक आहे.
-नंदा जिचकार, महापौर, नागपूर.