Published On : Sat, Nov 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीणच्या सहाही मतदासंघाचा निकाल जाहीर;कोणत्या उमेदवारांनी राखला गड?

Advertisement

नागपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. याकरिता आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल जाहीर होत आहेत. नागपूर ग्रामीणच्या सहाही मतदासंघात कोणत्या उमेदवारांनी बाजी मारली हे स्पष्ट झाले आहेत.

कामठी मतदारसंघातून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे विजयी –
कामठी मतदारसंघातून कॉंग्रेसचे सुरेश भोयर यांना पराभूत करत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाची मुसंडी मारली आहे. कामाठी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे होते. अखेर याठिकाणी बावनकुळे यांनी बाजी मारली.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमरेड मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम यांनी मारली बाजी-
उमरेड मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम यांनी बाजी मारली असून 12825 मतांनी त्यांनी भाजपच्या सुधीर पारवे यांना पराभूत केले. मेश्राम यांना एकूण 85372 मत मिळाली आहेत तर त्यांच्या तूलनेत सुधीर पारवे यांना 72547 मते मिळाली आहे.

हिंगणा मतदारसंघात भाजपच्या समीर मेघे यांचा दणदणीत विजय –
हिंगणा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणारे समीर मेघे बहुमताने निवडून आले आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश बंग यांचा पराभव केला.

रामटेकमधून आशिष जयस्वाल बहुमताने विजयी –
रामटेक मतदारसंघात शिवसेना गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल बहुमताने निवडून आले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना पराभूत केले. या मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

सावनेर मतदारसंघातून भाजपच्या आशिष देशमुख यांचा विजय –
सावनेर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आशिष देशमुख बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अनुजा केदार यांना केले पराभूत केले.देशमुख यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

काटोल मतरदारसंघातून भाजपच्या चरणसिंग बाबूलालजी ठाकुर विजयी –
काटोल मतरदारसंघातून चरणसिंग बाबूलालजी ठाकुर विजयी झाले असून त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलील देशमुख यांना पराभूत केले. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आता याठिकाणी भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे.

Advertisement