नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या योजनांचे नागपुरातील मुस्लिम महिलांनी स्वागत केले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीतील मुस्लिम महिलांच्या एका गटाने यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना निवेदन दिले.
मुस्लिम महिलांनी निवेदनात म्हटले की,महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेहमीच आभारी राहतील. तिहेरी तलाक, महिलांना एकट्याने हज यात्रा करण्याची सुविधा आणि सबका साथ सबका विकास यासारख्या योजनांसाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारी आहोत. कारण यामुळे अल्पसंख्याक समुदायातील लोकांनाही मदत झाली असल्याचे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मोहसीन खान यांनी सांगितले. मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळात महिलांनी उज्ज्वला योजना, पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे आणि आयुष्मान भारतच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळाला आहे.
इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या ड्रोन दीदी योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यास मदत मिळाली आहे, असे शरीफा कुरेशी म्हणाल्या.