Published On : Mon, Jul 1st, 2024

शाळेची घंटा वाजली; नागपुरात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून जल्लोषात स्वागत

Advertisement

नागपूर : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर आज विदर्भासह नागपुरातील सर्वच शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची सूचना केली होती.

त्यानुसार शिक्षकांनी शाळेत पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहर्‍यावर पसरलेला आनंद, तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा संमिश्र वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवसाला सुरुवारत झाली. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर आज समोवारी शाळेची पहिली घंटा वाजली.

Advertisement

प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्‍यांनी शाळेत पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या.

मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी मैत्री करताना दिसले.