Advertisement
आज नागपूरला औरंबादहून काही विद्यार्थी एम.फिल च्या जागां संदर्भात मा. श्री. विजयजी वडेट्टीवार, महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री यांना निवेदन देण्यकरिता आले असता, त्यांना मंत्री महोदयांची भेटण्याकरिता वेळ भेटत नसल्याने विद्यार्थ्याने आत्मदहनाचा ईशारा दिला असता त्यांना पोलीसां तर्फे अटक करण्यात आली. भाजयुमो द-प मंडळाचे अध्यक्ष यशजी सातपूते हे लगेच बजाज नगर पोलीस स्टेशनला पोहचले अन् विद्यार्थ्यांना पोलीसांच्या ताब्यातुन सोडविण्यात मदत केली. यावेळी मंडळाचे महामंत्री करणजी यादव, राकेशजी भोयर, आशुतोषजी भगत, अंकीतजी दास ऊपस्थीत होते.