शासकीय विज्ञान संस्था ही उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्यच्या अंतर्गत येते, गुणवत्ता व संशोधनाच्या बाबतीत या संस्थेला देशात ओळखले जाते.उच्चशिक्षा विभूषित प्राध्यापक,संपूर्ण यंत्र उपकरणाची उपलब्धी,संशोधन व क्रीडाक्षेत्रात असलेला वाव,सर्व सोयी सुविधा व अभ्यास योग्य वातावरण या संस्थेची जमेची बाजू आहे.या संस्थेने आता पर्यन्त अनेक प्रतिष्ठित व नामवंत व्यक्ती घडवलेले आहे व आजही शासकीय विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यशाची घोडदौड सुरूच आहे.24 मार्च 2018 ला नागपूर विद्यापीठाचा 105 वा दिक्षांत समारंभ पार पडला त्यात शासकीय विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांचे नाव अनेक पदकांवर कॊरले गेले व 2016-17 च्या गुणवत्ता यादीत सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे नाव झळकले आहे.
त्यात विद्यापीठातील 12 पदके प्राप्त करून तिसऱ्या क्रमांकावर असलेली रचना कानोजिया,10 पदके प्राप्त करणारी झरीन जोया,5 पदके प्राप्त करणारी स्वराली वांढरे,तीन पदके प्राप्त करणारा नेहाल वैद्य,1 पदक प्राप्त करणारी अंजना पटेल यांनी तामिळनाडूचे राज्यपाल महामहिम बनवारीलालजी पुरोहित यांच्या हस्ते सन्मान प्राप्त केला.तसेच गुणवत्ता यादीत देखील संस्थेतील 7 विद्यार्थ्यांचे नाव आहेत त्यात मृणाल पांडे,अंजली परिहार,नेहा कुंडू,सुजाता कुकडे,निधी पाटील,निर्मल बोरकर,निकिता आत्राम हे आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ आर जी आत्राम सर यांनी सर्वांना एकत्र बोलावून कौतुक केले व येणाऱ्या काळात हीच यशाची परंपरा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यासाठी संस्थेतर्फे सर्व त्या सोयी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही दिली