कन्हान : – सुनिता मेश्राम महिला मित्र परिवार व्दारे टेकाडी कालोनी येथे नवनिर्वाचित जि प अध्यक्षा व पं स सभापती व महिला सदस्या यांंच्या सत्कारासह महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सरपंचा सुनीता मेश्राम महिला मित्र परिवारा व महिला मंडळ व्दारे मकर संक्रांती च्या निमित्त्य वेकोली टेकाडी वसाहत येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करू न नवनिर्वाचित जि प अध्यक्षा सौ रश्मी ताई बर्वे, कन्हानच्या नगराअध्यक्षा करू णाताई आष्टणकर, पंचायत सामिती सभापती मिना कावळे तसेच सदस्या यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला बचत गट व भजन मंडळच्या सर्व सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्य क्रमाच्या आयोजिका टेकाडी ग्रा पं च्या सरपंचा सुनिता मेश्राम, पायल झोड़, शितल चिमोटे, ज्योती वासाडे, सुरेखा कांबळे, वैशाली देविया यांनी सर्व महिलां ना हळदी कुंकू, वान दिले. परिसरातील सुकेशनी भोवते, सारिका वासाडे, वर्षा फुटाने, आशा कदम, स्वाती सावरकर, वैशाली थोरात, अंजु जाधव, निसु तिवा री, मनिषा चिखले, इंदिरा कुमी, विभला शा जाधव सह जवळपास ३०० महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे महत्व प्रास्तवि कातुन पायल झोड यानी सागितले. सुत्र संचालन जोशिला कांबळे यांनी तर आभार गुडिया झोड ने मानले. सर्वाना महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.