नागपूर : वाठोडा पुलिस स्टेशन अंतर्गत बहादुरा रोड टीचर कॉलनी येथे मध्यरात्री अपघाताची भीषण घटना घडली. अपघातादरम्यान घटनास्थळी असलेल्या खोल गाड्यात पडून अश्विन गेडाम नावाच्या इसमाचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती सकाळी स्थानिकांना कळताच त्यांनी वाठोडा पोलिस स्टेशनला यासंदर्भात कळविले.यानंतर तातडीने वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी आपले कर्तव्य बजाबात नागरिकांना याठिकाणाहून हटविण्यास सुरुवात केली. मात्र याचदरम्यान स्थानिक बाबा बोकडे नावाच्या व्यक्तीने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
कोणतेही कारण नसताना पोलिसांना त्याने शिवीगाळ केली. हा वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी बाबा बोकडेला ताब्यात घेत पोलीस वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र बोकडे याने विरोध करण्यास सुरुवात केली याचदरम्यान रागाच्या भरात त्याने पोलीस अधिकाऱ्यासोबत धक्काबुक्की केली. हा वाद इतका चिघळला की त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
गर्दीत उपस्थित काही व्यक्तींनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वाठोडा पोलिसांनी बाबा बोकडे याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात सरकारी काममध्ये अडथळा निर्माण करण्यासहित इतर कालमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.