नागपूर : महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम नागरिक आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वे राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्राने केलेली प्रगती देशाने पाहिली आहे. एकूण जीडीपीच्या 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. 30 टक्के गुंतवणूक राज्यात येते. हे पाहता महाराष्ट्राने चांगली प्रगती केली असून पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पहिले जाते, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकार नागपूर शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने शहराच्या दृष्टीने मेडकील आणि मेयोसाठी 300 कोटींचा रिकसन्ट्रक्शनचा प्रकल्प हाती घेतला आहे. ऍग्रो सेंटर, रस्ते, ग्रामीण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील असून ट्रेलियन डॉलरपर्यंत राज्याला आपल्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे.
दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्ताने शासकीय समारंभाचे आयोजन कस्तुरचंद पार्कवर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, लोकप्रतिनिधी, माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पथकांचे निरीक्षण केले. पथसंचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले तर सेकंड इन कमांडर राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक संतोष गिरी यांनी केले.