Published On : Sat, Dec 8th, 2018

सैनिकांच्या पाठिशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा – अश्विन मुदगल

नागपूर : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशा कर्तृत्ववान सशस्त्र सेनेमुळे भारतीय सुरक्षित आहेत. ते सिमेवर अहोरात्र देशाच्या सिमा सांभाळत असून, आज त्यांच्यासाठी सढळहस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत करत संपूर्ण देश खंबीरपणे पाठिशी उभा असल्‍याचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, निवृत्त माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी, श्रीमती वसुधा सहस्त्रभोजनी, तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात करुन म्हणाले की, सशस्त्र सेनेमुळे आपण सर्वजन सुरक्षित आहोत. देशाची सशस्त्र सेना सिमेवर शत्रूराष्ट्रासह, दहशतवादी, मानवी आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यासह स्वकियांसोबतही लढत असतात. प्रसंगी त्यांना वीरगतीही प्राप्त होत असते. त्यांच्यानंतर त्यांचे कुटूंब, पाल्यांप्रती आपली सर्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. वीर जवानांच्या कुटूंबाच्या अडीअडचणी सोडविणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबरपासून ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात होते. तो पुढील वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन केले जाते, असे श्री. मुदगल यांनी यावेळी सांगितले.

Gold Rate
Saturday 01 March 2025
Gold 24 KT 85,300 /-
Gold 22 KT 79,300 /-
Silver / Kg 94,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ध्वजदिन निधी संकलनाला आजपासून सुरुवात झाली. गतवर्षीप्रमाणे यंदाही सेवानिवृत्त माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश देत संकलनाला सुरुवात केली. गतवर्षी नागपूर जिल्ह्यातून जवळजवळ 80 लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला होता, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

देशाच्या सिमा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करताना उदभवणारी संकटे, अतिवृष्टी, वादळे वा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करत सैनिक देशवासीयांच्या मदतीला धावून येतात. हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. गेल्यावर्षी श्री. ग. सहस्त्रभोजनी यांनी ५० हजार रुपयांचा ध्वजनिधी दिला होता, असे सांगत जिल्ह्यातील नागरिकांनी सढळहस्ते निधी संकलनाला हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

यावेळी माजी सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी सांगितले की, युध्दजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडणाऱ्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये व अपंगत्व आलेल्या जवानांना १ ते ३ लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ध्वजदिन निधीतून ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शहरामध्ये जावे लागते. अशा पाल्यांना राज्यात 35 मुलांची व 17 मुलींची वसतिगृहे बांधून सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी गतवर्षीच्या संकलीत ध्वजदिन निधीतून विविध कल्याणकारी योजनेतंर्गत माजी सैनिक, सैनिक विधवा, वीरपत्नी यांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामध्ये औषधोपचार १ लाख ६७ हजार, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण ६४ हजार, व्यावसायिक शिक्षण २२ लाख १७ हजार, शिष्यवृत्ती २ लाख ६३ हजार, चरितार्थ चालवण्यासाठी २ लाख ३२ हजार, अंत्यविधी करण्यासाठी ४ लाख ४० हजार आणि पाल्यांचे लग्न, वीरपत्नी व शौर्यपदक धारकांना एसटी प्रवास सवलतीसाठी ३ लाख ४८ हजार अशा विविध योजनांच्या माध्यमातून ५२६ जणांना ३७ लाख ३३ हजार १६३ रुपयांची आर्थिक मदत केल्याचे श्री. लिमसे यांनी सांगितले.

माजी सैनिक व पाल्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष गौरव

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याहस्ते दोन माजी सैनिक व ७ पाल्यांचा विशेष गौरव करुन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये क्रीडा प्रकारात पॅरा ॲथ्लेटीक २०१७ मध्ये शॉटफुटमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेले माजी सैनिक रामचंद्र सायरे यांना शाल व १० हजार रुपयांचा धनादेश, तर चीन येथे झालेल्या आशिया मस्टर ॲथ्लेटीकमध्ये सहभागी माजी सैनिक अकरम खान यांनाही शाल व १० हजार रुपयांचा धनादेश देऊन जिल्हाधिकारी श्री. मुदगल यांनी गौरविले.

तसेच संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु. अंजली ठाकरे हिला शाल व १० हजार रुपयांचा धनादेश, तसेच इयत्ता दहावीत भूमिका बागडे (९२%), मिनाक्षी खनगई (९०), स्विटी चन्ने(९०) तर इयत्ता १२ मध्ये दीक्षा पांडे (९५), विधी सोनवाने (९४) आणि फुलेश चाफलेला (९१) विशेष गुण मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते शाल व १० रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी मानले. यावेळी माजी सैनिक कुटुंबासह मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सेवानिवृत्त माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी यांच्याकडून ध्वजदिन निधी संकलनाला 75 हजारांचा धनादेश

सेवानिवृत्त माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी हे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाला यावेळी सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे 75 हजार रुपयांचा धनादेश ध्वजदिन निधी संकलनात आपला खारीचा वाटा उचलला. गतवर्षी श्री. ग. सहस्त्रभोजनी यांनी 50 हजार रुपयांचा धनादेश सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये दिला होता, हे विशेष. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Advertisement